दाऊ गाडगेवाड हिमायतनगर प्रतिनिधी /-
राज्यातील आयटीआय काॅलेज ला त्या त्या परिसरातील थोर पुरुषांची नावे देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने दि ८ ऑक्टोबर २०२४ रोजी घेतला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने हदगाव आयटीआय काॅलेज ला हदगाव चे थोर संत दत्ताबापु चे नाव दिले.
वैराग्यमुर्ती श्री दत्ता बापु हे सदैव गोरगरिबांच्या, दीन दलीतांच्या, भोळ्याभाबड्या जनतेच्या मदतीला धावून जायचे. दत्ता बापूंचा संसारी जीवांना फार मोठा आधार होता. दत्ता बापू हे खऱ्या अर्थाने जनतेचे मायबाप होते .
अशा दत्ता बापूचे नाव हदगाव आयटीआय काॅलेजला आणि महर्षी कपिलमुनीचे नाव हिमायतनगर आयटीआय काॅलेजला दिल्यामुळे महाराष्ट्र शासनाचे मी आभार मानतो. तसेच हदगाव हिमायतनगर परिसरातील ज्या ज्या मान्यवरांनी मॅसेज व पत्राद्वारे शासनाला श्री दत्ताबापु चे व महर्षी कपिलमुनीचे नाव सुचविले त्या सर्व मान्यवरांचे सुद्धा मी आभार मानतो असे मत भारतीय जनता पार्टी च्या अध्यात्मिक आघाडी चे उत्तर नांदेडचे जिल्हाध्यक्ष तथा भानुदास महाराज संस्थान येहळेगावचे उपाध्यक्ष प्रा.गजानन गावंडे सर यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देवून स्वता:चा उद्योग सुरू करुन त्यांना आपले आयुष्य सुखासमाधानाने जगण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वता: च्या पायावर सक्षमपणे उभे करण्याचं काम राज्यातील आयटीआय काॅलेज करत आहेत.
आयटीआय काॅलेजला थोर पुरुषांची नावे दिल्यामुळे त्यांचे विचार, त्यांचे समाज उद्धाराचे कार्य विद्यार्थ्यांच्या मनात कायम स्वरुपी राहील. थोर पुरुषांनी दाखवून दिलेल्या मार्गावरुन विद्यार्थी आपल्या आयुष्याची वाटचाल करतील असं ही गावंडे सर म्हणाले.
